खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष संजय कुबल होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, उमेदवारी कुणालाही मिळो त्या उमेदवाराच्या पाठीशी राहून भरघोस मतांनी निवडून आणू. अशावेळी बंडखोरी केलेल्या नेत्याला भाजप कार्यकर्ते धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. यावेळी त्यांनी भाजप कार्यालयाच्या इमारत उभारणीसाठी १ लाख रूपयाची मदत जाहिर केली.
यावेळी भाजप नेते किरण यळ्ळूकर व सुभाष गुळशट्टी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला.
व्यासपीठावर बेळगांव जिल्हा भाजपाचे उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठल हलगेकर, धनश्री सरदेसाई, सुरेश देसाई, वसंत देसाई, आपय्या कोडोळी उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत माजी शहर अध्यक्ष राजेंद्र रायका यांनी केले.
भाजप युवा नेता पंडित ओगले, जयंत तिनईकर, उदय भोसले, प्रकाश बैलूरकर, बाळू सावंत, तसेच व्यासपीठावरील नेत्यांनी विचार व्यक्त केले.
यावेळी भाजप नेते, कार्यकर्त्यानी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आभार गुंडू तोपिनकट्टी यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta