खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा (शेडेगाळी) रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय “बेळगाव वार्ता”च्या बातमीची दखल घेत. तसेच बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने ही कमान हटविण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा रेल्वेगेट जवळ कमान उभारण्यात आली होती. रेल्वे लाईनचे दुपदरीकरण करण्यात आल्याने शेडेगाळी रेल्वे गेटवर रुंदीकरणाचे काम चालू होते. यामुळे रस्त्याची उंची वाढवण्यात आली व येथील कमानीचा या भागातील ऊसाच्या ट्रकना ये-जा करताना त्रास होत होता. त्यामुळे कमान काढुन या भागातील ऊस वाहतुकीच्या वेळी होणारी अडचण दूर करावी अशा मागणीचे निवेदन या भागातील नागरिकांनी तहसीलदार प्रवीण जैन यांना देण्यात आले होते. या प्रश्नाची दखल घेत बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी शेडेगाळी रेल्वे गेटवर भेट देऊन हुबळी रेल्वे अधिकारी प्रभाकरन यांना दूरध्वनीवरून चर्चा करून ही कमान हटवण्याची मागणी केली. यावेळी प्रभाकरन यांनी रेल्वेचे इंजिनीयर शशीधरन यांना सांगून ती कमान हटवण्यात आली. प्रमोद कोचेरी यांच्या पुढाकाराने या भागातील मणतुर्गा, असोगा, शेडेगाळी, शिरोळी, अशोकनगर, तिवोली, देगाव, हेमडगा, नेरसा, जामगावव अनमोड पर्यंतच्या सर्व खेड्यांना रेल्वे कमानीच्या त्रासातून सुटका मिळवून दिली. यावेळी भाजपा प्रधान कार्यादर्शी गुंडू तोपीनकट्टी व इतर गावातील असंख्य शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta