खानापूर (प्रतिनिधी) : कौलापूरवाड्यात (ता. खानापूर) येत्या कार्तिकी वारी रोजी दीड दिवसाचा पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम बुधवारी दि. २ रोजी पार पडला.
पहिल्यांदाच कौलापूरवाड्यात दीड दिवसाचा पारायण सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्याला खानापूर तालुक्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार, अशी माहिती खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील यांनी दिली.
पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवताना खानापूर तालुका आम आदमी अध्यक्ष भैरू पाटील, मनोहर मजुकर चेअरमन वारकरी सोसायटी पिरनवाडी, व्हाईस चेअरमन मनोहर पाटील, संचालक डॉ. उदय देसाई, मारूती पाटील, वाघू पाटील, गंगाराम बावदाणे, नामदेव पाटील, नवलू पाटील, धानू पाटील, बाबू येडगे तसेच गावचे नागरिक, युवक मंडळ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta