खानापूर (प्रतिनिधी) : खेमेवाडी (ता. खानापूर) गाव पणजी- बेळगांव महामार्गापासून हाकेच्या अंतरावर आहे. मात्र खेमेवाडी गावाला गेल्या पंधरा दिवसापासून वीजपुरवठा सुरळीत नसल्याने खेमेवाडी गावाच्या नागरिकांची दिवाळी अंधारात गेली. अजूनही गाव रात्रीच्या अंधारात आहे. त्यामुळे खेमेवाडी गावच्या नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
रात्रीच्यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे लहान मुलांना, वृध्दांना घराबाहेर पडणे खूप त्रासाचे होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांना वीजपुरवठा खंडित झाल्याने अभ्यासाचे नुकसान होत आहे. गावातील दोन कांडप गिरण्या बंद झाल्या आहेत. वीजपुरवठा नसल्याने मोबाईल स्विच ऑफ झाले आहेत.
इतके होऊनही संबंधित हेस्काॅम खात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तर लोकप्रतिनिधीनाही याचे सोयेरसुतीक नाही. त्यामुळे संबंधित हेस्काॅम खात्याच्या कामगिरीबद्दल तसेच लोकप्रतिनिधींच्या बेफिकीरीबद्दल नागरिकांतून नाराजी पसरली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta