खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या सदस्यांनी नुकतीच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांची बेंगळुरू मुक्कामी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेला असून या समाजाला विविध स्तरावर आरक्षण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांनी स्वत: पुढाकार घेऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची विनंती क्षत्रिय मराठा परिषदेचे खानापूर तालुका अध्यक्ष तसेच युवा कार्यकर्ते अभिलाष देसाई यांनी केली.
यावेळी संजय भोसले व परिषदेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
