खानापूर : बेटणे (खानापूर) येथील मिनी गॅस सिलिंडर स्फोटात जखमी झालेल्या दोन रुग्णांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये (बिम्स) रामा गावडे आणि शीतल गावडे यांची डॉ. सोनाली सरनोबत यांनी भेट घेऊन विचारपूस केली.
तुलसी विवाह पूजा करत होते आणि नंतर जेवत असताना ही घटना घडली. डॉ. सरनोबत यांनी आरएमओ सरोजा तिगडी आणि प्रभारी डॉक्टरांशी रुग्णांच्या स्थितीबाबत चर्चा केली. या दोन रुग्णांच्या उपचारासाठी मनापासून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. नाईक गल्लीतील करिअप्पा मरियप्पा नाईक यांना विजेचा धक्का लागून जखमी झालेला दुसरा रुग्ण भेटला. त्याचा एक हात कापला असून तो गंभीर जखमी आहे. त्यांना शासनाकडून मदतीचे आश्वासन दिले.
Belgaum Varta Belgaum Varta