खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव -धारवाड नवीन रेल्वेमार्गाला सुपीक जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी गर्लगुंजी, देसुर, नंदीहळ्ळी, केकेकोप्प आदी गावचे दोनशेहून अधिक शेतकरी सोमवारी दि. ७ रोजी धारवाड येथील केआयडीबीच्या विशेष जमिन अधिग्रहण अधिकारी वर्गाला शेतकऱ्यांनी वैयक्तिक आक्षेप नोंदविले.
जवळपास १३०० एकर जमीन संपादित करणाऱ्या बेळगाव- धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी या गावाच्या शेतकऱ्यांना जमीन संपादन करण्यासाठी नोटिशी बजावल्या आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी पसरली. रेल्वे मार्गासाठी पर्यायी रेल्वे मार्गाचा विचार करावा व जमीन संपादित करू नये असा अक्षेप नोंदविला. एवढेच नव्हे तर पर्यायी मार्गाचा अवलंब केला तर चार किलोमीटर अंतर कमी होणार व पर्यायी रेल्वे मार्गामुळे गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप आदी गावाची सुपीक जमीन वाचणार आहे, असे म्हणणे शेतकऱ्यांनी मांडले.
आक्षेप नोंदविताना गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील, शेतकरी सुनिल पाटील, मारूती मेलगे, नामदेव सिध्दाणी, विलास पाटील, संजय सिध्दाणी, सुधाकर पाटील, परशराम सिध्दाणी, एस एन गोरे, विलास वामन पाटील, शिवाजी सातापा भातकांडे, प्रशांत पाटील, शिवाजी चिकदिनकोपकर, एस आर पाटील, जी पी पाटील, उदय हट्टीकर, नारायण जाधव, लक्ष्मण जाधव आदी गर्लगुंजी नंदीहळ्ळी, केकेकोप आदी गावचे शेतकरी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta