खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरासह तालुक्यात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई हे बुधवारी दि. ९ रोजी सायंकाळी चार वाजता येथील खानापूर शहराच्या जांबोटी क्राॅसवरील मलप्रभा क्रीडांगणावर खानापूर तालुक्यातील भाजप नेते व कार्यकर्त्यांची भेट घेऊन सभेत संवाद साधणार आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.
या सभेच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी खानापूर शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने येथील रेल्वे स्टेशन रोडवरील भाजपच्या कार्यालयात सोमवारी बैठक पार पडली. प्रास्ताविक राजेंद्र रायका यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत शहर माजी भाजप अध्यक्ष किरण यळ्ळूरकर यांनी केले.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे शहर अध्यक्ष नगरसेवक आप्पया कोडोळी होते. तर बैठकीला भाजपचे माजी शहर अध्यक्ष भाजप नेते किरण यळ्ळूरकर, भाजप युवा नेते पंडित ओगले, पदाधिकारी प्रसार माध्यम प्रमुख राजेंद्र रायका, जाॅर्डन गोन्सालवीस, सुनिल नाईक, प्रकाश निलजकर, रवी बडगेर, शिवा मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांचे पहिल्यांदाच खानापूर शहरात आगमन होत आहे. हे आमच्या खानापूर शहरवासीयांचे भाग्य आहे.
तेव्हा हा कार्यक्रम सर्वानी मिळून मोठ्या उत्साहाने व शिस्तबद्ध पध्दतीने पार पडायचा आहे. तेव्हा नियोजन करून मुख्यमंत्र्याचे आगमन सुरळीत पार पाडू. या कार्यक्रमाला बेळगांवसह खानापूर तालुक्यातील ३० हजार हुन अधिक नागरिकांची उपस्थित राहणार आहेत, असे मार्गदर्शन केले.
Belgaum Varta Belgaum Varta