खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील पाणी पुरवठा, गटारी, मोक्ष धाम दुरूस्ती, अतिक्रमण घर बांधणी आदी विषयांवर खानापूर नगरपंचायतीच्या स्थायी समितीच्या गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. तर व्यासपीठावर उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलिपी, चीफ ऑफिसर बाबासाहेब माने आदी उपस्थित होते.
यावेळी प्रेमानंद नाईक यांनी प्रास्ताविक केले.
चीफ ऑफिसर बाबासाहेब माने उपस्थित नगरसेवकांचे स्वागत केले.
यावेळी मलप्रभा नदीच्या नव्या ब्रिजवर संरक्षण कठडा धोक्याचा झाला आहे. तसेच ब्रिजपासून ते मर्याम्मा मंदिर हलकर्णी पर्यंतच्या महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यासाठी संबंधित पी डब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांना सुचना करून दुरूस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
खानापूर पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नागरिकांना नळाना पाईप लावणे बंद करण्याबाबत, पाण्याचा दुरूपयोग करणाऱ्यांवर कारवाई करणे, गटारीची दुरूस्ती करणे, घर अतिक्रमण जागेवर बांधण्याऱ्यांवर कारवाई करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थायी समिती चेअरमन प्रकाश बैलूरकर यांनी शहरात बीएसएनएल खात्याचे निरूपयोगी खांब जागोजागी उभे आहेत ते काढून घेण्यासाठी बीएसएनएल खात्याला सुचना करू अन्यथा ते काढुन टाकून रस्त्यावरची अडचण दूर करू, असे सागितले.
बैठकीत समाजसेवक जयंत तिनईकर यांनी खानापूर काही नागरिकांनी चार लाख रूपये नगरपंचायतीचा टॅक्स भरला नाही. त्याबाबत मी स्वतः नगरपंचायतीला तक्रार करून वरिष्ठांना कळवून कोणतीच दखल घेतली नाही. येत्या सात दिवसात यावर दखल घेतली नाहीतर स्वत: जाहीर पत्रक काढून शहरातील नागरिकांनी कोणताच टॅक्स भरू नका असे आवाहन करणार असल्याचे बैठकीत सांगितले.
बैठकीत मोक्षधामची चावी कोणीही घेऊन जाते. ती परत येऊन लागत नाही. यासाठी मोक्षधामची चावी जवळ असलेल्या फिल्टर हाऊसमध्ये ठेवावी असे सांगून, मोक्षधामच्या दुरूस्तीसाठी ५ लाख निधी वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मलप्रभा नदीच्या पात्रात गटारीचे पाणी मिसळते. यावर प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी येऊन भेट देऊन गेलेत यावर लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती चीफ ऑफिसर बाबासाहेब माने यांनी दिली.
यावेळी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील नागरिकांच्या समस्येबाबत चर्चा करण्यात आली.
स्थायी समितीच्या बैठकीला नगरसेवक नारायण मयेकर, आपय्या कोडोळी, विनोद पाटील, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, सहेरा सनदी स्थायी समिती सदस्य उपस्थित होते. तसेच नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.
आभार प्रेमानंद नाईक यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta