खानापूर (प्रतिनिधी) : लोक संस्कृती नाट्य कला संस्था प्रस्तुत शाहिर अभिजीत कालेकर लिखीत खानापूर तालुक्यातील कलाकारांनी एकत्रीत येऊन तयार केलेल्या लोकसंस्कृतीची ओळख करून देणाऱ्या जागर लोकसंस्कृतीचा कार्यक्रम शनिवारी दि. १२ रोजी सायंकाळी ६ वाजता खानापूर येथील अर्बन बँक समोर आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला संस्कृतीचे संस्थापक दादासाहेब तोपिनकट्टी हे उपस्थित राहतील.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजप नेते विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते होणार आहे.
दीपप्रज्वलन माजी आमदार दिगंबर पाटील, मुरलीधर पाटील पीएचडी बँक चेअरमन, संजय कुबल भाजपा तालुका अध्यक्ष, तसेच बेळगांव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, आदीच्याहस्ते होणार आहे.
तर रंगमंचचे पुजन जेडीएस नेते नासीर बागवान यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन होणार आहे.
यावेळी विशेष मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा खानापूर शहरासह तालुक्यातील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन लोक संस्कृती नाट्य कला संस्था यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta