
खानापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी हिंदू शब्दाबाबत केलेले वादग्रस्त विधान संपूर्ण हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या. अशा वादग्रस्त विधानाचा खानापूरात शुक्रवारी निषेध करण्यात आला.
यावेळी खानापूरातील लक्ष्मी मंदिरापासुन निषेध मोर्चा काढण्यात आला.
खानापूर तालुका भाजप कार्यालयाच्या समोर निषेध मोर्चाने घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पणजी बेळगांव महामार्गावरील खानापूर शिवस्मारक चौकात रास्ता रोको करून निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी भाजप युवा नेते पंडित ओगले, प्रमोद कोचेरी, संजय कुबल, बजरंग प्रमुख नंदकुमार निट्टूरकर, श्री. किरमिटे, बाळू सावंत, किरण यळळूरकर आदीनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.
या निषेद मोर्चाला भाजपचे नेते किरण यळळूरकर, मिडीया प्रमुख राजेंद्र रायका यांच्या सह अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta