खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने शुक्रवारी दि. 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिसमधून खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदीनी पोस्ट पत्राव्दारे शुभेच्छा पाठविल्या.
यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते विठ्ठलराव हलगेकर, माजी जि. प. सदस्य बाबूराव देसाई, जोतिबा रेमाणी, किरण यळ्ळूरकर, वसंत देसाई, राजेंद्र रायका, सयाजी पाटील, विठ्ठल पाटील, गुंडू तोपिनकट्टी, पंडीत ओगले, संजय कंची, सुनिल नाईक, रमेश पाटील, बाबासाहेब देसाई, शिवा मयेकर, जॉर्डन गोन्सालवीस, सदानंद होसुरकर, तानाजी गोरल, लक्ष्मण बामणे, मारूती पाटील, बामणे, बाळू सावंत, सुनिल मासेकर आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पत्राव्दारे शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पेठे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
