खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथे गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंडळ हायस्कूल बेकवाड येथील सभागृहात तहसील कार्यालय, बालविकास व महिला शिष्य अभिवृध्दी व तालुका आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक आहार शिबीराचे आयोजन पार पडले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार रेश्मा तालिकोटी, बालविकास व महिला शिष्य अभिवृद्धी खानापूर अधिकारी राममूर्ती के. व्ही, तालुका आरोग्य अधिकारी संजीव नाद्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बिडी सर्कलमधील 29 अंगणवाडी केंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्र बिडी व ग्रामपंचायत बेकवाड आदीचा सहभाग होता. प्रारंभी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनीच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. तर शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रेश्मा तालिकोटी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व झाडांना पाणी घालून करण्यात आले.
यावेळी तहसीलदार रेश्मा तालिकोटी, बालविकास आधिकारी राममूर्ति, डॉ. बावची, रमेश मेदर, श्री. गावडे, प्रशांत बाळेकुंद्री, श्री. धाबाले आदींची भाषणे झाली. शिबिरमध्ये गर्भवती महिलांची ओटी भरणे सहा महिन्याच्या आतील मुलांना पूरक पौष्टिक आहार देणे व गर्भवती महिला, बाळंतीन महिला तसेच 0 ते 6 वर्षापर्यंतच्या मुलांना पूरक पौष्टिक आहार संबंधी माहिती देणे अशा विविध प्रकाराची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला बिडी प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. बावची, डॉ. विकास पै, वरिष्ठ महिला आरोग्य सहाय्यकी महादेवी शिवशिंपगी, महिला आरोग्य सहाय्यकी एम. आर. चिकोर्डी, बाल विकास खात्यामधील तालुका वलय अधिकारी सुनंदा यमकनमर्डी, बिडी वलय अधिकारी स्वेता हिट्टींन, बेकवाड ग्रामपंचायत विस्तीर्ण आधिकारी नागप्पा बने, तोलगी सी. आर. सी.चे अधिकारी रमेश मेदर, बेकवाड हायस्कूलचे हेड मास्तर विष्णू गावडे, बेकवाड ग्रामपंचायत व्याप्तीमधील शाळांचे मुख्याध्यापक एम. के. पाटील, महेश पाटील, भोमाजी कांबळे, एस. डी. मार्यापगोल, एम. आर. पाटील, बेकवाड ग्राम सुधारणा कमिटीचे कार्यदर्शी शिवराम पाटील, सदर्श अशोक गुरव, जनाकप्पा पाटील, ग्रामपंचायत व्याप्तीमधील खैरवाड, हडलगा, बंकीं बसरीकट्टी गावचे नागरिक उपस्थित होते. ग्राम पंचायत सभासद व नोकर वर्ग त्याचबरोबर बिडी सर्कलमधील अंगणवाडी कार्यकर्ते व सहाय्यकी आणि आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कांबळे तर आभार प्रदर्शन श्वेता हिट्टींन यांनी केले.
बेकवाड ग्रामपंचायत व्याप्तीमधील स्वसहाय्य संघाचे प्रतिनिधी, ग्रामपंचायत व्याप्तीमधील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद तसेच गावातील नागरिक व पंच मंडळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
Check Also
टेनिस हाॅलीबाॅल स्पर्धेसाठी मराठा मंडळ ताराराणी कॉलेजच्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय निवड
Spread the love खानापूर : मराठा मंडळ ही शिक्षण संस्था क्रीडा स्पर्धेत खेळाडू विद्यार्थ्यांना नेहमीच …