बैठकीत नागरीकांची मागणी
खानापूर (प्रतिनिधी) : बाळंगुद तालुका खानापूर येथे गुरुवारी हिंदू धर्म जनजागृती व विकास योजना मार्गी लावण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर तालुका भाजपा नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बाळगुंद गावाला जोडणार्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला.
या प्रश्नाला उत्तर देतााना पंडित ओगले म्हणाले की, रस्त्यासाठी अनुदान मंजूर झाले आहे. पण वन खात्याने रस्त्याचे काम अडविले आहे. ती अडचण मार्गी लावावी अशी मागणी केली. यासाठी वन खात्याचे मंत्री उमेश कत्ती हे बेळगाव जिल्ह्यातीलच आमदार कार्य सांभाळत आहेत यासाठी लवकरच त्यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही दिली.
यावेळी प्रास्ताविक किरण तुडवेकर यांनी केले. जयराम बिडकर यांनी बाळगुंद गावच्या समस्या मांडल्या. यावेळी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते व तसेच सुत्रसंचालन रमेश सत्यन्नवर यांनी केले.
