खानापूर (प्रतिनिधी) : निलावडे (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत वनखात्याच्या हद्दीपासून जंगली प्राण्यापासून संरक्षण व्हावे यासाठी चर खोदण्याचे काम रोजगार हमी योजनेतून करण्यात आले आहे.
वनखात्याच्या हद्दीपासून दीड मीटर खोली, तळ एक मीटर रुंद अशा पद्धतीने चर मारण्यात आली.
यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे उपाध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी रोजगार हमी योजनेतील कामाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
यावेळी निलावडे ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील कामगार उपस्थित होते. यावेळी निलावडे ग्राम पंचायतीचे पीडीओ श्री. मोकाशी, वनखात्याचे अभियंते एस. सत्तेगेरी यांनी रोजगाराना कामाबद्दल माहिती दिली.
यावेळी शेकडो रोजगार कामाच्या ठिकाणी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta