गर्लगुंजीचा सुपूत्र सध्या गोव्यात राहणारा नेहल तुकाराम पाटील याचे इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेत सहभाग
खानापूर (प्रतिनिधी) : मुळचा गर्लगुंजी (ता. खानापूर) गावचा सुपूत्र सध्या गोवा येथील पोलिस खात्याचे अधिकारी तुकाराम पाटील यांचे चिरंजीव नेहल तुकाराम पाटील याने गेल्या महिन्यात चेन्नई तामिळनाडू येथे झालेल्या मी. इडिया स्पर्धेत लुक ऑफ द इअर २०२२ व मी इंडिया वेस्ट झोन २०२२ स्पर्धेत यश संपादन केले.
आता त्याची रूबरू मिस्टर वेस्ट इंडिया २०२२ मध्ये १८ व्या इंटरनॅशनल माॅडेलिंग काॅपिटेशन स्पर्धा १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरपर्यंत पोर्ट ऑफ स्पेन साऊथ यूएसए येथे होणार आहेत.
या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या मिस्टर वेस्ट इंडिया इंटरनॅशनल माॅडेलिंग स्पर्धेसाठी ३८ देशातील ३८ स्पर्धक सहभागी होणार आहेत. तर भारताचे नेतृत्व नेहल पाटील करणार आहे. तो दि. १८ रोजी स्पर्धेसाठी मुंबई येथून रवाना होत आहे.
त्याच्या कार्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यावरण मंत्री रोहन खोटे यांनी नेहल पाटील यानी शुभेच्छा दिल्या.
नेहल पाटीलच्या यशाबदल गर्लगुंजी (ता. खानापूर) परिसरातून अभिनंदन होत आहे.
नेहल पाटील हा मुळचे गर्लगुंजीचे व सध्या गोवा पोलिस खात्याचे अधिकारी तुकाराम पाटील यांचे सुपूत्र होत.
Belgaum Varta Belgaum Varta