खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर २ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई वार्ड नंबर दोनचे नगरसेवक तोहिद चांदखन्नावर यांच्या हस्ते पुजन करून करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर दोन मधील रहिवासी जॅकी फर्नाडीस, इस्माईल नंदगडी, राजेंद्र रायका, विशाल रायका, शंकर देसाई, आर. आय. पाटील, राघवेंद्र शेट्टी, अप्पू बाळ कट्टी, अजित शैल, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मिशन कंपाऊंडमधील वार्ड नंबर दोनचे नगरसेवक तोहिद चांदखन्नावक यांच्याहस्ते मशीन पुष्पहार घालून कूपनलिका खोदाई कामाचा शुभारंभ केला.
यावेळी नगरसेवक तोहिद म्हणाले की, खानापूर शहरातील मिशन कंपाऊंड मध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन पाण्याची सोय व्हावी. यासाठी कूपनलिका खोदण्याचा सतत प्रयत्न होत होता. याचा योग आज मिळाला. म्हणून सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका मंजुर करण्यात आली.
व कूपनलिका खुदाईचा शुभारंभ करण्यात आला. याशिवाय वार्डात दोन ठिकाणी जल कुंभ उभारून पाईप लाईनव्दारे पाण्याची सोय होणार त्यामुळे मिशन कंपाऊंडमधील नागरिकांची पाण्याची सोय झाली. या भागातील नागरिकांतून समाधान पसरले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta