अनेक जखमी; सुदैवाने जीवितहानी टळली
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजी (ता. खानापूर) गावापासून उत्तर दिशेला असलेल्या आजोबा मंदिर जवळच्या कणवीच्या उतारतीला हुदली येथून आलेला पॅसेंजर टेम्पोला न्यूट्रल मध्येच ब्रेक न लागल्याने दोन पलट्या घेऊन पलटी झाल्याने प्रवासी टेम्पोतील जवळपास २० ते २५ जण किरकोळ जखमी झाले. मात्र दैवबलवत्तर म्हणून जीवीतहानी झाली नाही. सर्वांना वडगाव केएलई दवाखान्यात दाखल करण्यात आले.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हुदली गावचे नागरिक लग्न ठरविण्यासाठी गर्लगुंजी गावाकडे येत होते. गर्लगुंजी गावच्या उत्तरेस असलेल्या कणवीच्या उतारतीला टेम्पो चालकाला अचानक ब्रेक लागले नाहीत गाडी न्यूट्रलमध्येच ब्रेक न लागल्याने दोन वेळा प्रवासी टेम्पो पलटी झाला. त्यामुळे टेम्पोतील अनेक जण जखमी झाले आहेत. काहींची बोटे तुटली, काहींच्या पायाना मार लागला तर काहींना मुका मार लागला.
घटनेची माहिती मिळताच गर्लगुंजी ग्राम पंचायतीचे माजी अध्यक्ष गोपाळ पाटील, विद्यमान सदस्य प्रसाद पाटील व इतर सदस्य गावचे युवक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन लागलीच वडगाव केएलईत जखमींना दाखल केले. लागलीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.
यावेळी खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
Belgaum Varta Belgaum Varta