खानापूर : खानापूर तालुक्यातील नागरगाळी ग्रामपंचायत अंतर्गत तावरगट्टी गावातील राजू काकतकर यांच्या मुली कुमारी श्रद्धा काकतकर, स्नेहा काकतकर, रेणुका काकतकर, निकिता काकतकर, सावित्री काकतकर या विद्यार्थीनींना उच्च शिक्षणासाठी संगणकाची गरज असल्याचे निवेदन समस्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या निवारण केंद्रात केले होते. या निवेदनाची दखल घेत खानापूर भाजपा महिला मोर्चाच्या प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर समस्या निवारण केंद्र कार्यालयात संगणक वाटप करण्यात केले.
यावेळी बोलताना डॉ. सोनाली सरनोबत म्हणाल्या की, तावरगट्टी हे गाव खानापुरच्या सीमेवर असून आमच्या नियती फाऊंडेशनच्या वतीने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी मदत करत आहोत.
यावेळी कल्लाप्पा कंग्राळकर, राजू काकतकर, नागेश रामजी, परशुराम कोलकार, बालेशा चव्हानावर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta