Wednesday , March 4 2026
Breaking News

नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने दादोबानगर वार्ड नं. १७ मध्ये कूपनलिका खुदाई

Spread the love

 

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या प्रयत्नाने खानापूर शहरातील नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मध्ये १५ व्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका खुदाई पुजन करून करण्यात आले.
यावेळी नगरपंचायतीच्या वार्ड नंबर १७ मधील सामाजिक कार्यकर्ते रवी काडगी, महेंद्र इलीगार, महांतेश बासरकोड, प्रकाश गुरव, महिला वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दादोबा नगरमधील वार्ड नंबर १७ नगरसेवक व नगराध्यक्ष मजहर खानापूरी यांच्या हस्ते मशीनला पुष्पहार घालून कूपनलिका खोदाई कामाचा शुभारंभ केला.

यावेळी नगराध्यक्ष मजहर खानापूरी म्हणाले की, खानापूर शहरातील दादोबा नगरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासुन पाण्याची सोय व्हावी. यासाठी कूपनलिका खोदण्याचा सतत प्रयत्न होत होता. याचा योग आज मिळाला. म्हणून सरकारच्या पंधराव्या वित्त आयोग निधीतून कूपनलिका मंजुर करण्यात आली.
व कूपनलिका खुदाईचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी साडेतीन इंच पाणी लागले. याशिवाय वार्डात १७ मध्ये ठिक ठिकाणी जल कुंभ उभारून पाईप लाईन व्दारे पाण्याची सोय होणार. त्यामुळे दादोबानगरमधील नागरिकांची पाण्याची सोय झाली. या भागातील नागरिकांतून समाधान पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश

Spread the love  खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *