
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची विस्तृत कार्यकारिणी करण्यासाठी इदलहोंड पंचायतमधील गावे खेमेवाडी, झाडअंकले, माळअंकले, सिंगीनकोप आणि निट्टूर पंचायतीतील निट्टूर व गणेबैल गावांचा समितीच्या आठ प्रतिनिधींसमवेत समितीची नेतेमंडळी माजी आमदार दिगंबरराव पाटील, आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, रुक्माणा झुंजवाडकर, संतोष पाटील इत्यादींनी दौरा केला. इदलहोंड येथील श्रीपिसेदेव मंदीरात सभा झाली, सभेचे अध्यक्ष डॉ. एल. एच. पाटील होते. यावेळी इदलहोंड गावातील भाऊराव पाटील, गोविंद जाधव, नागेश पाटील, महादेव पाखरे इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. निट्टूर येथे सुभाष नार्वेकर व नानु नार्वेकर यांनी निट्टूर गावची जबाबदारी घेऊन म. ए. समितीच्या पाठीशी राहण्याचे वचन दिले व कार्यकारिणीवर प्रतिनिधी पाठविण्याचे अभिवचन दिले. त्याचप्रमाणे गणेबैल, खेमेवाडी, माळअंकले, झाडअंकले, सिंगीनकोप आणि इदलहोंड ग्रामस्थांनी म. ए. समितीच्या कार्यकारिणीवर सदस्य पाठवून समिती बळकट करण्याचे अभिवचन दिले. यावेळी समितीचे अष्टप्रतिनीधी प्रकाश चव्हाण, गोपाळराव देसाई, यशवंतराव बिर्जे, रमेश धबाले, धनंजय पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर व हणमंत मेलगे यांच्या नेतृत्वाखाली दौरा संपन्न झाला. यावेळी प्रत्येक गावातील बहुसंख्य समितीप्रेमींनी सहभाग घेतला.
उद्या या भागात होणार दौरा
उद्या मंगळवार दिनांक २२ नोव्हेंबर रोजी कसबा नंदगड ग्रामपंचायत व बेकवाड ग्रामपंचायत मध्ये म. ए. समितीचा आठ सदस्यीय संपर्क दौरा संध्याकाळी ५ वाजता सुरू होणार असून याची सुरुवात कसबा नंदगड पंचायत क्षेत्रातील गावांना भेटी देऊन होणार व त्यानंतर रात्री 8 वाजता सांगता बेकवाड पंचायतीतील गावांना भेटी देऊन खैरवाड येथे होणार आहे. तरी या जागृती मोहीम आणि विस्तृत कार्यकारिणी निवडीसाठी संबंधित पंचक्रोशीतील समिती प्रेमी व तालुक्यातील आजी माजी समिती नेतेमंडळींनी उपस्थित रहावे,असे अष्टप्रतिनीधी मंडळ कळवित आहे.
Belgaum Varta Belgaum Varta