खानापूर : तालुका खानापूर मौजे शेडेगाळी येथे सात वर्षानंतर होणाऱ्या गोंधळाचे वार दि. 22 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. हे वार दि. 25 नोव्हेंबर (शुक्रवार) दि. 29 नोव्हेंबर (मंगळवार) दि. 2 डिसेंबर (शुक्रवार) दि. 6 डिसेंबर (मंगळवार) असे पाच दिवस पाळण्यात येणार असून आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांना तसेच पाहुणे मंडळींना कळविण्यात येते की, या वारमध्ये कोणीही गावांमध्ये प्रवेश करू नये. हे वार खूप खडक पाळण्यात येत असून, गावांमधील व्यक्ती गावाबाहेर जाण्यास आणि गावाबाहेरील व्यक्ती गावामध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे. याची दखल सर्वांनी घ्यावी, अशी विनंती शेडेगाळी गावातील पंच मंडळी व ग्रामस्थ यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच दिनांक 13 डिसेंबर मंगळवार रोजी रात्र गोंधळ व जागरण तसेच बुधवारी सकाळी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले आहे तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा, अशी विनंती गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta