खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर-रामनगर महामार्गाचे काम गेल्या तीन वर्षभरापासून कायद्याच्या चौकटीत अडकून बंद पडले होते. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा खानापूर- रामनगर महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या कामात मोहरम टाकून काम करण्याऐवजी केवळ माती टाकून महामार्गाचे काम करण्यात येत असल्याने महामार्गावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहन चालकाना तसेच प्रवाशांना या धुळीचा अतोनात त्रास होत आहे.
याची माहिती मिळताच बेळगाव जिल्हा भाजपा उपाध्यक्ष प्रमोद कचेरी यांनी खानापूर महामार्गावरील सावरगाळी येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली.
यावेळी संबंधित कंत्राटदाराला बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी चांगलेच धारेवर धरून महामार्गाच्या कामात माती वापरली असेल तर स्वामी टेस्ट करून माती आढळलेली असल्यास माती काढून पुन्हा त्या महामार्गावर मोहरम टाकून रस्ता करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. व संबंधित अभियंताना याबाबत माहिती देऊन खानापूर- रामनगर महामार्गाचे काम उत्कृष्ट दर्जाचे करण्यास भाग पाडणार, असे सांगितले.
यावेळी खानापूर खानापूर तालुका भाजप सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, तसेच या भागातील नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta