कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांची कारवाई
कोल्हापूर : कोल्हापूर पोलिसांनी पुन्हा एकदा अद्वितीय कामगिरी करताना राजस्थानी गुंडांना कोल्हापुरी पाणी दाखवून दिले आहे. राजस्थानमध्ये बेछुट गोळीबारात खून करून फरार झालेल्या पाच जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी थरारक पाठलाग करून काल पकडले. कोगनोळी टोल नाक्यावर पोलिसांनी ही कारवाई केली. पकडलेल्या पाच जणांच्या टोळीने गोळीबार करून खून केल्याची कबूली दिली आहे.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार जमिनीच्या वादातून राजस्थानमधील भरतपूरमध्ये गोळीबार करून एकाचा खून करून फरार पाच जणांची टोळी फरार झाली होती. या टोळीला कागल पोलिसांनी सापळा रचत मुसक्या आवळल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण, पेठवडगाव आणि कागल पोलिसांनी केलेल्या अद्वितीय कामगिरीने टोळी जेरबंद झाली.
भरतपूरमध्ये 4 सप्टेबर गोळीबार करून एकाचा 10 जणांनी खून केला होता. या खुनानंतर पाच जण फरार झाले होते. हे पाच जण कोल्हापूरहून गोव्याकडे जात असून त्यांच्या हत्यारे असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांना मिळाली होती. त्यानंतर कागल पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजितकुमार जाधव यांना कोगनोळी टोल नाकाबंदी करून तपासणी करण्याचे आदेश दिेले. त्यानुसार जाधव यांनी तातडीने कोगनोळी टोल नाका गाठत नाकाबंदी केली आणि गोव्याकडे जाणार्या वाहनांची कसून तपासणी सुरु केली.
एमपी 09 सीक्यू 3724 या नंबरच्या स्विफ्ट डिझायरची तपासणी सुरु करताच तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, जाधव व त्यांच्या पथकाने त्यांना शिताफीने उचलत पोलिस ठाण्यात आणले. गाडीची झडती घेतली असता बेसबॉलची बॅट आढळली. संशयितांनी रिव्हॉल्वर व गावठी कट्टा अशी चार हत्यारे राजस्थानमध्येच एका ठिकाणी ठेवल्याचे सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta