Thursday , October 10 2024
Breaking News

कोल्हापुरात हनीट्रॅपचा धडाका, अल्पवयीन मुलीने तरुण कापड व्यापार्‍याला अडीच लाखाला लुटले

Spread the love

कोल्हापूर : हनीट्रॅपमध्ये अडकवून तरुणाला अडीच लाख रुपयाला गंडवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.21) रविवारी कोल्हापुरात उघडकीला आला आहे. दरम्यान हा तरुण कापड व्यापारी आहे. युवतीसह टोळीच्या दहशतीला घाबरून तसेच सोशल मीडियावर फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी दिल्याने व्यापाराने दोन दिवसांपूर्वी किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र नातेवाईक आणि पोलीसांच्या सर्तकेतेेमुळे तरूणाचा जीव वाचला आहे.
हनीट्रॅप टोळीचा म्होरक्या सागर माने हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या टोळीकडून फसवणूकीचे प्रकार झाले असल्यास संबंधितांनी थेट पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी केलेे आहे. शहरातील मध्यवर्ती परिसरातील एका 17 वर्षीय अल्पवयीन युवतीसह सहा जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेतले आहे. या सहा जणांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हवाली केले आहे. याप्रकरणी राजवाडा पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीसह साखळीतील संशयित विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने कोल्हापूर येथील हनीट्रॅपचा पर्दाफाश केला आहे.
मुंबई-पुणे पाठोपाठ कोल्हापुरातही हनीट्रॅपचा सलग दुसरा प्रकार उघडकीला आल्याने शहरासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. संबंधित युवतीसह तिच्या साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने ताब्यात घेऊन जुना राजवाडा पोलिसांच्या हवाली केले आहे. फिर्यादी असलेल्या तरुणाची अल्पवयीन युवतीबरोबर काही काळापूर्वी ओळख झाली. त्यानंतर संबंधित युवतीने तरुणाशी मैत्री वाढवले त्यानंतर युवतीने तरुणाला भेटण्यास बोलवले असता तो तेथे गेला.
सोन्यासह अडीच लाखांवर डल्ला
त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या साथीदाराने तरुणाला गाठले. रोख रक्कम व सोने असा अडीच लाखाचा ऐवज तरुणांकडून घेण्यात आला. या घटनेनंतरही पैशाची मागणी होऊ लागल्याने संबंधिताने स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्याशी संपर्क साधून कैफियत मांडली. पथकाने सापळा रचून युवतीसह साथीदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. हनीट्रॅप प्रकरणी बेड्या ठोकलेल्या आरोपींमध्ये सागर पांडुरंग माने (वय 32) राहणार कळंबा, सोहेल उर्फ अरबाज मुनाफ वाटंगी रा. जुना वाशी नाका, उमेश श्रीमंत साळुंखे रा. राजारामपुरी, आकाश मारुती पाटील रा. यादवनगर, लुकमान शकील सोलापूर रा. जवाहरनगर, सौरभ गणेश चांदणे रा. माडा कॉलनी यांचा समावेश आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाजपकडून छत्रपती शिवरायांच्या विचारांचे संविधान संपवण्याचा प्रयत्न : राहुल गांधी

Spread the love  कोल्हापुरात राहुल गांधींच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण कोल्हापूर : हिंदुस्थानात दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *