उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनच्या 2021-22 निवडणुकीत या संस्थेला नवीन अध्यक्ष लाभला आहे. अध्यक्ष पदी प्रभू यतनट्टी तर उपाध्यक्ष पदी सुधीर चव्हाण, सचिन शिवन्नावर यांनी बाजी मारली. अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत दिनेश पाटील यांचा पराभव झाला.
शनिवारी दिवसभर अत्यंत चुरशीने मतदान झाले होते मध्यरात्री दीड वाजता संपूर्ण निकाल लागला होता. तुरळक पाऊस असला तरी निकाल ऐकण्यासाठी वकिलांनी रात्री पर्यंत गर्दी केली होती.एकूण 11 जागांसाठी 20 वकील रिंगणात होते. निवडणुकीचे निकाल येताच वकिलांनी फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा केला.
गिरीश पाटील जनरल सेक्रेटरी निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. दोन उपाध्यक्ष पदासाठी पाच रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. उपाध्यक्ष पदी सचिन शिवन्नावर यांनी आरामात विजय विजय मिळवला तर दुसर्या जागेसाठी सुधीर चव्हाण यांनी चुरशीत बाजी मारली.
जॉईंट सेक्रेटरी पदासाठी चार जण रिंगणात होते त्यात बंटी कामाइ यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली. महिला प्रतिनिधी पदासाठी दोन उमेदवार होते त्यात पूजा पाटील विजयी झाल्या. मॅनेजिंग कमिटीच्या पाच सदस्यासाठी 13 जण उभे होते त्यात महंतेश पाटील यांनी सर्वाधिक मते मिळवत विजय संपादन केला तर त्या खालोखाल अभिषेक उदोशी, आदर्श पाटील, इरफान बवाळ व प्रभाकर पवार विजयी झाले. बेळगाव बार असोसिएशनसाठी दिवसभर एकूण 2091 पैकी 1622 जणांनी मतदान केलं होतं. सायंकाळी 5:30पर्यंत मतदान झाले तर 6:30 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली ती मध्यरात्री दीड वाजता संपली.
