कोल्हापूर (वार्ता) : दोन दिवसापूर्वी काँग्रेसचे वाचाळवीर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे यशस्वी सक्षम पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने नाना पटोले यांचा बिंदू चौक येथे तीव्र निषेध करण्यात आला. देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो, नाना पटोले कोण रे पायतान मारा दोन रे, नाना पटोलेच करायचं काय खाली डोक वर पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद, काँग्रेसचा धिक्कार असो, नाना पटोले यांना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देत पुतळ्याचे दहन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, संपूर्ण जगभरात भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आपल्या नेतृत्व गुणांमुळे ओळखले जातात. परंतु गेली अनेक वर्षे देशाला लुटणार्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांमध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या बद्दल असूया आणि द्वेषाची भावना प्रत्येक गोष्टीतून दिसून येते. याचे ज्वलंत उदाहरण घ्यायचे झाले तर नुकताच पंजाब मधील नरेंद्रजी मोदी यांच्या दौर्यामध्ये सुरक्षेमध्ये झालेली गंभीर चूक. पंजाब दौर्याप्रसंगी पंजाब पोलीस आणि प्रशासनाचे काँग्रेस हायकमांड यांना रिपोर्टिंग आणि दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांनी केलेले पंतप्रधान यांच्याबद्दल हे वक्तव्य गंभीर असून संपूर्ण काँग्रेस पक्ष हा एक मार्गी नरेंद्रजी मोदी यांना रोखण्यात, त्यांच्या जीवाला धोका पोहोचवण्यात कामाला लागला आहे काय अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी केलेल्या या गंभीर विधानाबद्दल त्यांना तात्काळ अटक करावी आणि पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जीवाला धोका पोचण्याच्या संदर्भातील वक्तव्याबद्दल त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करत असल्याचे सांगितले.
आपले मनोगत व्यकत करताना जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी नाना पटोले यांना आपल्या जिभेला लगाम घालण्याचा सल्ला दिला. सरचिटणीस विजय जाधव यांनी काँग्रेसची संस्कृती याच पद्धतीची असून नाना पाटोले यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्या खाली तात्काळ अटक करण्याची मागणी केली. संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी काँग्रेस नेत्यांच्या वर्तवणूकी बद्दल शंका निर्माण झाली असून पंतप्रधान यांच्याविरोधात देशातील हे नेतेच कट रचत असल्याचे नमूद केले.
यानंतर भारतीय जनता पार्टीच्या वतीने नाना पटोले यांच्या पुतळ्याला जोडे मारून हा पुतळा दहन करण्यात आला. या पुतळ्या भोवती बोंब मारत भाजपा पदाधिकार्यांनी निषेधाची होळी केली.
भारतीय जनता पार्टीच्या या तीव्र निदर्शना नंतर भाजपा जिल्हा पदाधिकारी यांनी जुना राजवाडा पोलीस स्टेशन, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी यांनी शाहूपुरी पोलीस स्टेशन, भाजपा ओबीसी मोर्चाने लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन येथे एफआयआर नोंद करण्यास गेले असता प्रशासनाच्यावतीने गुन्हा नोंद करून घेण्यात आला नाही. सदर घटना भंडारा जिल्ह्यात घडली असल्याने त्याठिकाणी हा गुन्हा नोंद करता येईल त्याचबरोबर त्याठिकाणी कोणती कारवाई करणात आली आहे याची माहिती आपल्याला दिली जाईल असे पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांना सांगितले. यानंतर भाजपाच्यावतीने लेखी तक्रारीचे निवेदन संबंधित पोलीस स्टेशन, पोलीस उपअधीक्षक कार्यालय याठिकाणी देण्यात आले.
आजच्या बिंदू चौक येथे झालेल्या या निषेधाच्या ठिकाणी दिलीप मैत्राणी, गणेश देसाई, राजू मोरे, संजय सावंत, चंद्रकांत घाडगे, सचिन तोडकर, प्रदीप उलपे, अजित सूर्यवंशी, विजय अग्रवाल, दिग्विजय कालेकर, भारती जोशी, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, भरत काळे, विजयसिंह खाडे-पाटील, विवेक वोरा, अनिकेत मुतगी, सुनील पाटील, अभिजीत शिंदे, विशाल शिराळकर, आजम जमादार, नरेंद्र पाटील, मंगला निपाणीकर, सुनिता सूर्यवंशी, सुजाता पाटील, राधिका कुलकर्णी, कोमल देसाई, सुजाता पाटील, संदीप कुंभार, महेश यादव, प्रकाश कालेकर, विद्या बनछोडे, संध्या तेली, राजाराम परिट, दिलीप बोंद्रे, देवेंद्र जोंधळे, गौरव सातपुते, वल्लभ देसाई, ओमकार खराडे, संतोष माळी, विनायक पोळ, शाहरुख गडवाले, प्रीतम यादव, सिद्धांत भेंडवडे, अनिकेत सोलापुरे, वीरेंद्र मोहिते, गिरीष साळोखे, ओंकार कारंडे, अशोक लोहार यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार
Spread the love योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर …