Wednesday , December 6 2023
Breaking News

सयाजी हॉटेल कोल्‍हापूरमधील मून ट्रीकडून ‘चायनीज न्‍यू इअर २०२२ फेस्टिवल’चे आयोजन

Spread the love

कोल्‍हापूर : सयाजी हॉटेल कोल्‍हापूरमधील मून ट्री १ फेब्रुवारी २०२२ पासून चायनीज न्‍यू इअर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. लुनार न्‍यू इअर किंवा चायनीज न्‍यू इअर हे वसंत ऋतू आगमनाचे प्रतीक आहे आणि प्रदेशामधील चायनीज समुदाय हे वर्ष साजरे करतात. प्रत्‍येक वर्ष राशीचक्रामधील प्राण्‍याशी संलग्‍न आहे आणि वर्ष २०२२ हे वाघाचे वर्ष आहे. १० दिवस चालणाऱ्या या महोत्‍सवामध्‍ये खासरित्‍या तयार केलेल्‍या चायनीज पाककला दाखवणाऱ्या सर्वोत्तम पाककलांचा समावेश असणार आहे.
अला कार्टे मेनूमध्‍ये शाकाहारी व मांसाहारी चायनीज पाककलांचा समावेश आहे, जसे सलाड्स, सूप्‍स, स्‍टार्टर्स, रोल्‍स, राईस, नूडल व डिसर्टस्. स्‍वादिष्‍ट स्‍टार्टर्समध्‍ये वेजीटेबल टेम्‍पुरा, ड्राय रेड चिली सॉसमध्‍ये तयार केलेले फ्रेश टोफू, कॅन्‍टोनीज स्प्रिंग रोल, तीळ टाकलेले कुरकुरीत हनी पोटॅटो, विविध प्रकारचे सूप्‍स व सलाड्सचा समावेश आहे.
स्‍वादिष्‍ट मेन कोर्सेसमध्‍ये स्टिर-फ्राईड वेजीटेबल्‍ससह सोबा नूडल, मस्‍सामन वेजीटेबल करीसह लेमन राईस, सिलिकॉन टोफू चिली ऑयस्‍टर सॉससह नूडल्‍स, हुनान सॉसमधील एक्‍झॉटिक वेजीटेबलसह सिंगापूर नूडल्‍स, हौसिन सॉसमधील स्‍लाइस्‍ड चिकनसह सोबा नूडल्‍स, एक्‍सओ सॉसमधील श्रेडेड लॅम्‍ब, सेलेन्‍टन फिशसह बासिल राईस आणि चायनीज पॅन-फ्राईड फिशसह सोया सॉस यांचा समावेश आहे.
मेन कोर्ससोबत डिसर्टस् देखील आहेत- जसे फ्राईड आईस्‍क्रीम, डेट पॅनकेकसह व्‍हॅनिला आईस्‍क्रीम आणि डारसानसह व्‍हॅनिला आईस्‍क्रीम.
मून ट्री हे कोल्‍हापूरमधील एकमेव गंतव्‍य आहे, जेथे २४X७ तास भारतीय, फ्यूजन, चायनीज, मेडिटेरनियन, युरोपियन असे विविध प्रकारचे स्‍वादिष्‍ट फूड आणि सर्वोत्तम दर्जाच्‍या कॉफीचा आस्‍वाद मिळतो.
दिनांक: १ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी २०२२
स्‍थळ: मून ट्री, सयाजी हॉटेल कोल्‍हापूर
भेट द्या: www.sayajihotels.com

About Belgaum Varta

Check Also

विधायक उपक्रम व संस्कृतीतून तरुणांचे शाहू महाराजांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे

Spread the love  कागलच्या शाहू लोकरंग महोत्सवात ११४ मंडळांचा मोरया पुरस्काराने सन्मान कागल (प्रतिनिधी) : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *