संकेश्वर (प्रतिनिधी) : आद्य श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविणेचे महान कार्य केल्याचे निडसोसी मठाचे पंचंम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींनी सांगितले. पादगुडी येथे श्रींच्या हस्ते श्री शंकराचार्य रजत पालखीचा उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. निडसोसी श्री. पुढे म्हणाले, श्री शंकराचार्यांनी धर्म सांस्कृती वाचविण्यासाठी २५ हजार कि.मी. पायी प्रवास केला. त्यांनी चारही दिशांना चार मठांची स्थापना केली. बदरी, केदार येथे पायी प्रवास कराल तर श्री शंकराचार्य यांनी सोसलेला त्रास तुम्हाला अनुभवता येईल. शंकराचार्य यांच्या धर्म सांस्कृती कार्याची दखल घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शंकराचार्य मूर्तीची स्थापना केली आहे. धर्म आपणाला प्रामुख्याने दान करण्यास शिकविते. त्याचबरोबर,चांगले संस्कार आपल्याला लाभतात.
संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाचा विकास- संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठात श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजी आले नंतर मठात अनेक सुधारणा झालेल्या पहावयास मिळत आहेत. श्रींनी भक्तांच्या देणगीचा सदुपयोग करून श्री शंकरलिंग देवाची रजत पालखी तयार केली आहे. पादगुडी येथे पाच श्रींच्या अमृत हस्ते रजत पालखीचा उद्घाटन सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला आहे. येथून रजत पालखीची मिरवणूक काढली जात आहे. त्यामुळे भक्तगणांत भक्तीभाव निर्माण झाल्याचे श्रींनी सांगितले. यावेळी कुरणीचे श्री मल्लिकार्जुन देवरु यांनी आपले विचार मांडले.
यावेळी कंपली स्वामीजी, विद्याशंकर भारती स्वामीजी, तसेच शंकरराव हेगडे, गजानन क्वळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी, गिरीश कुलकर्णी सुहास कुलकर्णी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक अमर नलवडे संजय शिरकोळी, अभिजित कुरणकर, नंदू मुडशी, बसवराज बागलकोटी, कुमार बस्तवाडी, प्रदीप माणगांवी, आणप्पा संगाई, चेतन बशेट्टी, बंटू बोरे, युवराज महाळंक, उमेश देवरक्की, विजय शेलार, हेमंत शिंदे, पुट्टू महाळंक, राजेश गायकवाड, विरुपाक्ष मलकट्टी, पालखी सेवक जगदीश शेट्टीमनी, प्रदीप कर्देगौडा, रवि शेट्टीमनी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखीवर भक्तगणांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली.
