Thursday , June 4 2026
Breaking News

मोराला युवकांकडून जीवदान!

Spread the love

बेळगाव : आंबेवाडी येथे जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला जीवनदान देण्यात आले. आंबेवाडी येथील शेतामध्ये किटकनाशन औषधाचे सेवन केल्यामुळे जखमी अवस्थेत पडलेल्या मोराला आंबेवाडी गावातील समाजसेवक राहुल भातकांडे, प्रेम तरळे, विकास भातकांडे, सतीश कोवाडकर यांनी लवकरात लवकर पशु वैद्यकीय डॉ. प्रताप हन्नूरकर यांच्याकडे मोराला घेऊन जाऊन उपचार केला. यानंतर मोराची स्थिती व्यवथित झाल्यावर बेळगाव ग्रामीणचे मा. अध्यक्ष विनय विलास कदम यांनी वनविभागाचे सिद्धार्थ चलवादी यांना संपर्क साधून मोराला त्यांच्या ताब्यात देण्यास सांगितले. श्री राम युवक मंडळ आंबेवाडीच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या कार्यात हातभार लावला. देशाच्या राष्ट्रीय पक्षाला जीवनदान दिल्याबद्दल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी समाजसेवकांचे आभार मानले व विनय विलास कदम यांनी सुद्धा आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

श्रीरामजन्म म्हणजे काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा आरंभ होय : डॉ. शेवडे

Spread the love  बेळगाव : पराक्रमी असूनही क्रूरकर्मा असलेल्या रावणाने देव, यक्ष, गंधर्व आणि राक्षस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *