खानापूर (प्रतिनिधी) : देशव्यापी चालु असलेल्या एलआयसी एजंटचा संप शुक्रवारी खानापूरातही येथील एलआयसी कार्यालयाकडे संप करण्यात आला.
यावेळी जगदिश जळके यांनी निवेदनाव्दारे आपल्या मागण्या सादर केल्या. कोरोना काळात एलआयसी एजंटाचा मृत्यू झालेल्या मुलाना मोफत शिक्षण देणे. कोरोना काळात लाॅकडाऊनमुळे ग्राहकाकडून लेट फि आकारू नका. कोरोना काळात मरण पावलेल्या एलआयसी एजंटाना वेलफेअर फंड मिळावा.
एलआयसी एजंटाना बोनस रेट वाढवून द्यावा.
अशा अनेक मागण्या खानापूर तालुक्यातील एलआयसी एजंटना निवेदनाव्दारे खानापूर एलआयसी ब्रॅंच मॅनेजर अशोक बेळगावी यांना देण्यात आले.
यावेळी ब्रॅंच मॅनेजर अशोक बेळगावी यांनी निवेदनाचा स्विकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
निवेदन देताना जगदिश जळके, शांताराम बिडकर, एम. एन. गुरव, महेश कदम, मारूती पाटील, रमेश बुसरोळी, फ्रान्सिस सोज व इतर एलआयसी एजंट उपस्थित होते.
Check Also
गणेबैल टोलनाक्यावर ठिय्या आंदोलन! बेकायदेशीर टोलनाका बंद करण्याची मागणी
Spread the love खानापूर : गणेबैल येथील बेकायदेशीर उभारण्यात आलेला टोल नाका बंद करण्यात यावा …