बंगळूर : राज्यात कोरोना संक्रमणाची संख्या कमी असली तरी, ग्रामीण भागामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्याच्या आरोग्य तज्ञ समितीने सरकारला दिला आहे. त्यामुळे १४ तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे.
मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा व काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सध्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शहर पातळीवर ती कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये पुरेशी दखल न घेतल्याने कोरोनाने आपले हात पाय या भागात वेगाने पसरलेले आहेत. त्यामुळे ७ जून पर्यंत असलेला लॉकडाऊन पुन्हा एक आठवड्याने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सध्याच्या काळामध्ये सकाळी ६ ते १० पर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची मुभा होती. त्यामुळे ग्राहकांची बाजारात गर्दी होत आहे. ही सवलत दुपारी दोन पर्यंत द्यावी का याबाबत सरकार विचार करत आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने कर्मचाऱ्यांना पुन्हा बिकट परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta