Monday , December 4 2023

विकेंड लॉकडाऊन संपल्यावर बेळगावात पुन्हा गर्दी

Spread the love

बेळगाव : २ दिवसांचा संपूर्ण कडक विकेंड लॉकडाऊन संपल्यावर सोमवारी बेळगावकरांनी पुन्हा बाजारात, रस्त्यांवर गर्दी केली. त्यामुळे पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी स्थिती गर्दीबाबत निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळाले.
कोरोनाची दुसरी भयंकर लाट रोखण्यासाठी राज्य सरकारने ७ मेपर्यंत लॉकडाऊन जारी केला आहे. याच दरम्यान जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण कडक विकेंड लॉकडाऊन जारी केला होता. त्याची मुदत आज सकाळी ६ ला संपली. सकाळी ६ ते १० पर्यंत खरेदीसाठी मूभा दिलेली असल्याने दोन दिवस घरात बसून राहिलेल्या लोकांनी आज बाजारात मोठी गर्दी केली. रस्त्यांवर, बाजारात जणू जत्रा भरली होती. दूध, भाजीपाला, फुले-फळे आणि अन्य जीवनावश्यक साहित्य खरेदीसाठी लोक मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले.
चन्नम्मा सर्कल, गणपत गल्ली आदी प्रमुख चौक आणि रस्त्यांवर सकाळी ६ ते १० या वेळेत मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले. सगळ्यांनीच सामाजिक अंतराचा नियम मोडल्याचे पहायला मिळाले.

About Belgaum Varta

Check Also

व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक

Spread the love  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *