बेंगळुरू : कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता येत संपूर्ण जून महिना राज्यात लॉकडाऊन जारी केला जाण्याची दाट शक्यता आहे. राज्याचे गृह, कायदा व संसदीय व्यवहार खात्याचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी तसे संकेत शनिवारी दिले.
बंगळुरात शनिवारी आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी बोलताना गृहमंत्री बोम्माई म्हणाले, केंद्र सरकार व केंद्रीय गृह खात्याने कोरोना रोखण्यासाठी ३० जूनपर्यंत कडक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत काय उपाय करायचे याबाबत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा सर्व मंत्र्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करतील. राज्यात कोरोनाचा संसर्ग अद्याप कमी झालेला नाही. संक्रमितांची संख्या आणि बळींची संख्या घटली तरच कोरोना नियंत्रणात आला असे म्हणता येईल असा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे असे बोम्माई म्हणाले.
केंद्र सरकारने जीएसटीची ११ हजार कोटी रक्कम राज्याला द्यायची आहे. काल झालेल्या बैठकीत ती देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांत राज्यात मोठी आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण दूर करण्याची मागणी कर्नाटकासह अनेक राज्यांनी केंद्राकडे केली असून केंद्राने ती मान्य केली आहे. जीएसटी भरपाई रक्कम आणि अन्य मदत देण्याचे केंद्राने आश्वासन दिले आहे असे बोम्माई यांनी सांगितले.
एकंदर कोरोना रोखण्यासाठी ३० जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत गृहमंत्री बोम्माई यांनी दिले आहेत.
Check Also
प्रा. डॉ. प्रवीण ए. घोरपडे यांचा सत्कार
Spread the love बेळगाव : इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर इंडिया बेळगाव शाखेच्या वतीने ५७ वा अभियंता …