Wednesday , April 17 2024
Breaking News

मंत्री शशिकला जोल्लेचा मडवाळमध्ये सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी खानापूर तालुक्यातील मडवाळ गावाला नुकताच धावती भेट दिली.
यावेळी गावच्या वेशीत त्यांचे ग्रामस्थाच्यावतीने सत्कार सोहळा पार पडला.
त्यानिमित्त गावचे सुपुत्र व खानापूर येथील श्री बिरेश्वर को. ऑप. सोसायटी शाखेचे चेअरमन बाबासाहेब देसाई यांनी त्यांचे स्वागत केले.
तर शोभा कोलकार यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार घालुन सत्कार केला.
सत्कार सोहळ्याला गावचे २०० हुन अधिक ग्रामस्थ उपस्थित होते.
मडवाळ गावाला प्रथम महिला व बालकल्याण मंत्री शशिकला जोल्ले यांनी भेट दिल्याबद्दल मडवाळ गावातुन समाधान पसरले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बॅलेट पेपरवर मराठीतून नावे समाविष्ट करा

Spread the love  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघात मराठी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *