बेळगाव : कंग्राळ गल्ली येथील आर्टिस्ट आकाश हलगेकर व मित्र परिवारातर्फे शनिवारी लोकराजा राजश्री शाहू छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त कणबर्गी बेळगाव येथील सागर नगर येथील झोपडपट्टीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी झोपडपट्टीतील रहिवाशांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी झोपडपट्टीतील लहान मुलांना लाडू, दूध व पाण्याचे वाटप करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराज यांनी दीनदलितांसाठी तन-मन-धनाने फार मोठे कार्य केले आहे. झोपडपट्टीत छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करीत कंग्राळ गल्ली येथील युवकांनी एक नवा पायंडा घातला असून या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने झोपडपट्टीतील रहिवासी व लहान मुलांच्या चेहऱ्यावरीलआनंद ओसंडून वाहत होता.
याप्रसंगी आकाश हलगेकर, सुनील कोलकार, करण देवरमनी, राहुल कोलकार, विष्णू इंगळी व इतर मित्र परिवार उपस्थित होता.
Check Also
चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना गोविंद टक्केकर यांच्याकडून शुभेच्छा!
Spread the love बेळगाव : सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक गोविंद टक्केकर यांनी चंदगड मतदारसंघातील नवनिर्वाचित …