बेळगाव : सरकारी कार्यालयांमध्ये कामकाजानिमित्त जनतेची वर्दळ खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनाचा काळ सुरू असल्यापासून पोलीस स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस सेवा बजावत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. सामाजिक स्वास्थ्यासाठी पोलिसांचे कार्य मोठे आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून कुटुंबालाही संसर्ग होऊ नये याची काळजी घेत माधुरी जाधव यांनी दक्षिण वाहतूक पोलिस ठाण्यात आणि कॅम्प महिला पोलीस स्थानकात मोफत निर्जंतुकीकरण केले. याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते विनय पाटील आणि अथर्व जाधव यांचे सहकार्य लाभले. या कार्यासाठी ठाण्याचे अधिकारी मंजुनाथ नाईक, सीपीआय श्रीदेवी पाटील, मंगला पाटील यांनी जाधव यांचे कौतुक केले.
