बेळगाव : राज्यातील असंघटित कामगारांना मान. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी कोरोनाच्या पहिला लाटेत प्रत्येकी पाच हजार रुपयाचे सहाय्यधन दिले. आता प्रत्येकी दोन हजार रूपये सरकारने जाहीर केले आहेत. कर्नाटक टेलर्स असोसिएशन बेळगाव जिल्हा प्रमुख श्री. कृष्ण भट्ट यांनी आजवर साडेतीनशेहून अधिक कामगारांना त्याचा लाभ करून दिला आहे. मात्र लिहिता वाचता न येणाऱ्या किंवा ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांनी माहिती नसल्यामुळे या सुविधेचा लाभ घेतला नाही. अशा टेलरिंग व्यवसायात असलेल्या व बीपीएल रेशन कार्ड असलेल्या कोणीही व्यक्तीने फक्त आपले आधार कार्ड व फोटो खालील मोबाईल क्रमांकावर व्हाॅट्सअप करावे 9742414201, 6362325714 किंवा 77927970 36 असे आवाहन कृष्णा भट्ट यांनी केले आहे.
