Friday , April 18 2025
Breaking News

श्रीमहालक्ष्मी कोविड सेंटरच्यावतीने डॉ. नाडगौडा यांचा सत्कार

Spread the love

खानापूर (प्रतिनिधी) : जागतिक डॉक्टर दिनाचे औचित्यसाधून खानापूर येथील श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटर व श्रीमहालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समितीच्यावतीने खानापूर तालुक्यातील डॉक्टर्स बंधुंचा सत्कार समारोह आयोजिला होता. यानिमित्ताने डॉ. डी. ई. नाडगौडा यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्रीमहालक्ष्मी ग्रूपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर म्हणाले की, डॉक्टर म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबातील एक सदस्य जनु, आणि त्याप्रमाणेच डॉक्टर लोकही आपली जबाबदारी पार पडतात. व्यवहारापलीकडे जाऊन अपुलकीच्या नात्याने रुग्णांची सेवा कायमच करत असतात, अशाच पद्धतीने कोरोना महामारीच्या या कठिण काळात सुद्धा आपल्या ह्या परिवारातील सदस्यांनी आपली काळजी घेतली, आपला स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचा जीव वाचविणे हे एक देवच करू शकतो. इतके असूनही जेव्हा खानापूरला या महामारीमुळे त्रास सहन करावा लागतो. अशावेळी खानापूरमध्ये कोविड केअर सेंटरची सुरूवात करण्यात आली. त्यावेळी सुद्धा ह्या सेंटरसाठी सर्व खानापुरच्या डॉक्टर्सनी सेवा देवून सहकार्य केले, व तालुक्यातील जनतेचा जीव वाचविण्याचे महान कार्य केले. म्हणून तर डॉक्टरांना देवाची उपमा दिली आहे, ह्या महामारीच्या काळत स्वत:च्या घरचे लोक सुद्धा रुग्णाच्या जवळ येत नव्हते, अश्या परिस्थितीत त्यांनी ह्या रुग्णांची सेवा केली, त्यांना मृत्युच्या दारातून परत आणले, असे विचार व्यक्त केले.
या सत्कारावेळी उपस्थित समितीचे पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते श्रीमहालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विट्ठलराव हलगेकर, श्रीमहालक्ष्मी कोविड केअर सेंटरचे अध्यक्ष किरण येळ्ळूरकर, उपाध्यक्ष पंडित ओगले, सचिव सदानंद पाटील, राज गावडे, आकाश अथणीकर, शिवराज, किरण तुडयेकर, गोपाळ भेकणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

महेश मांजरेकरांना जीवनगौरव, अनुपम खेर, काजोल, मुक्ता बर्वे अन् भीमराव पांचाळांनाही पुरस्कार जाहीर

Spread the love  मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *