Saturday , July 27 2024
Breaking News

भाजपचे सरप्राईज कार्ड! राज्यसभेसाठी पियुष गोयल व अनिल बोंडे यांची नावे जाहीर

Spread the love

मुंबई : राज्यसभेच्या 6 जागांसाठी लवकरच निवडणूक होत आहे. यापैकी 2 जागांवर शिवसेनेनं उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनं 2 जणांची नावं जाहीर केली आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना अपेक्षेप्रमाणे पुन्हा संधी देण्यात आली आहे. दुसर्‍या जागेवर माजी मंत्री अनिल बोंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे बोंडे यांचं नाव राज्यसभेसाठी चर्चेत नव्हतं. त्यामुळे भाजपनं हे नाव जाहीर करून सरप्राईज दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
डॉ. अनिल बोंडे ओबीसी समाजातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. बोंडे दोनवेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2009 मध्ये ते अपक्ष म्हणून विधानसभेवर गेले. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. मोर्शी मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. फडणवीस सरकारमध्ये ते कृषी मंत्री होते. 2019 च्या निवडणुकीत मात्र त्यांचा पराभव झाला. स्वाभिमानी पक्षाच्या देवेंद्र भुयार यांनी बोंडे यांना पराभूत केलं.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेल्या भाजपच्या तीन नेत्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामध्ये पियूष गोयल, विकास महात्मे आणि विनय सहस्रबुद्धेंचा समावेश आहे. पैकी गोयल यांना पक्षानं पुन्हा संधी दिली आहे. दोन जणांना राज्यसभेवर पाठवता येईल इतकं संख्याबळ भाजपकडे आहे. दुसर्‍या जागेसाठी भाजपनं बोंडेंना संधी दिली आहे. बोंडे सातत्यानं महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत असतात. याचीच बक्षिसी त्यांना मिळाल्याचं बोललं जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Spread the love    मुंबई : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *