Saturday , July 27 2024
Breaking News

बेळगावात महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Spread the love

बेळगाव : जुलमी मोगली राजवटीविरोधात तगडी झुंज देऊन देशासाठी प्राणांची बाजी लावलेल्या मेवाडचे शूर रजपूत राजे महाराणा प्रताप यांच्या 482व्या जयंतीनिमित्त बेळगावात रविवारी त्यांना अभिवादन करण्यात आले.
शहर-परिसरातील रजपूत समाज बांधवांच्या वतीने यानिमित्त महाराणा प्रताप यांच्या अर्ध पुतळ्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. धर्मवीर संभाजी महाराज चौकातून या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप वेर्णेकर, विहिंप प्रमुख कृष्णा भट, डॉ. बसवराज भागोजी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रताप आणि चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीत रजपूत समाजाच्या महिला, पुरुषांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभाग घेतला. यावेळी ‘जय शिवाजी-जयभवानी’, ‘महाराणा प्रताप की जय’ अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. शिवगर्जना ढोलताशा पथकाच्या गजरात युवक-युवतींनी पारंपरिक युद्धकौशल्याचे प्रदर्शन केले. त्यामुळे ही मिरवणूक लक्षवेधी ठरली. यावेळी बोलताना बेळगाव रजपूत समाजाचे अध्यक्ष अभयसिंग ठाकूर म्हणाले, महाराणा प्रताप यांच्या बलिदानाची आठवण ठेवण्यासाठी आणि त्यांचा त्याग, आदर्श सर्वाना कळावा म्हणून आज बेळगावातील रजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करून भव्य मिरवणूक काढली आहे. देव-देश-धर्माच्या रक्षणासाठी लढण्यात रजपूत समाज नेहमीच अग्रभागी राहिला आहे असे त्यांनी सांगितले.
धर्मवीर संभाजी चौकातून काढलेली ही जल्लोषी मिरवणूक रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, श्री शनी मंदिर, श्री कपिलेश्वर मंदिर मार्गे एसपीएम रोडवरील रजपूत समाजाच्या हनुमान मंदिरापर्यंत पोहोचली. तेथे मिरवणुकीची सांगता झाली. यावेळी रजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *