मुंबई : महाविकास आघडी सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. महाविकास आघडीमध्ये काँग्रेस पक्ष राहणार की जाणार यासाठी उद्या सोमवारी (ता. 30) दिल्लीत फैसला होणार आहे. काँग्रेस हायकमांडने उद्या महाराष्ट्रातली प्रमुख मंत्र्यांना तातडीने दिल्लीत बोलवले आहे. राज्यात सरकारमध्ये असूनही काँग्रेसला मिळत असलेली दुय्यम वागणूक, काँग्रेसच्या विषयाबाबत दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना मित्र पक्षांकडून अपेक्षित साथ मिळत नसल्याचे बोलले जात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत कोर्ट लढाईत काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसले. राष्ट्रवादीने काँग्रेसची कोंडी केल्याचे काही घटनांमधून दिसत आहे. जसे की काँग्रेसचे नगरसेवक फोडल्याचा आरोप राष्ट्रवादीवर करण्यात आला आहे. आमदार निधीमध्ये भेदभाव केला जात आहे. यामुळे काँग्रेसमधील नाराजी टोकाला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच महाविकास आघडीमध्ये काँग्रेसचे स्थान यावर उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक होत आहे.
