पटियाला : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यू झाल्याची घोषणा केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबचे गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची मानसा गावात काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुसेवाला यांच्या हत्येनंतर पंजाब सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत कारण एक दिवसापूर्वीच भगवंत मान सरकारने मुसेवालासह 424 जणांचे पोलीस संरक्षण काढून घेतले होते.
सिद्धू मुसेवाला यांनी मानसा येथून काँग्रेसच्या तिकिटावर पंजाब विधानसभेची निवडणूक लढवली आणि आप उमेदवार विजय सिंगला यांनी 63,000 मतांच्या मोठ्या फरकाने त्यांचा पराभव केला. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी नुकतेच विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केली होती.
गेल्या महिन्यात सिद्धू मुसेवाला यांनी त्यांच्या ’बली का करा’ या गाण्यात आम आदमी पार्टी आणि त्यांच्या समर्थकांना लक्ष्य केल्याने वाद निर्माण झाला होता. गायकाने आपल्या गाण्यात आप समर्थकांना ’गद्दर’ (देशद्रोही) म्हटले होते.
