मुंबई : सध्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान करण्यासाठी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. दरम्यान, या दोन्ही नेत्यांच्या अर्जावर उत्तर देण्यासाठी ईडीने वेळ मागितला आहे. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे. येत्या 8 जुन रोजी यावर सुनावणी होणार असल्याची माहिती न्यायलायने दिली आहे.
मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी राज्यसभेसाठी मतदान करता यावे म्हणून न्यायालयात अर्ज दाखल केले होते. या दोन्ही अर्जांवर ईडीने उद्यापर्यंत उत्तर द्यावे असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या अर्जांवर 8 जूनला सुनावणी होणार आहे. हे दोघेही राष्ट्रवादीचे नेते असून अगामी राज्यसभा निवडणुकीत आमदार म्हणून मतदानाचा हक्का बजावता यावा, यासाठी दोघांनीही न्यायालयात अर्ज दाखल केला होता. हे दोन्ही नेते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत.
महाविकास आघाडीने ती निवडणूक बिनविरोध होण्याकरिता प्रयत्न केले होते. मात्र भारतीय जनता पार्टीकडून शिवसेनेला त्यांचा उमेदवार मागे घेण्याचे सांगितले आले होते. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून उमेदवार मागे घेण्यात आले नसल्याने आता सातव्या जागेसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्वाचे असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अटकेत असलेले दोन्ही आमदारांना मतदानाकरिता परवानगी देण्यात यावी याकरिता अर्ज करण्यात आला आहे.
Check Also
भाजपची 22 जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर
Spread the love मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दुसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली …