Saturday , July 27 2024
Breaking News

लोकनेते कै. दादा साबळे यांचे स्वप्न पूर्ण करणार : प्रशांत साबळे

Spread the love

माणगांव (नरेश पाटील) : वॉर्ड क्र.15 ‘माणगांव विकास आघाडी’ मधून भरघोस मतांनी निवडून आलेले नगरसेवक प्रशांत अशोक साबळे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, माणगाववासीयांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून लोकनेते कै. अशोक दादा साबळे यांचे स्वप्न आपण पूर्ण करणार.

नवनिर्वाचित नगरसेवक प्रशांत साबळे हे लोकनेते माजी आमदार कै.अशोक साबळे यांचे कनिष्ट सुपुत्र आहेत. राजकीय वारसा लाभलेले एक उच्च शिक्षित नगरसेवक आहेत.

त्यांच्या विजयाचे श्रेय ते आपल्या वॉर्डमधील युवा कार्यकर्ते, मतदार तसेच आपल्या कुटुंबियांना दिले, त्याच प्रमाणे आपले बंधू राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनामुळे आपण हा विजय संपादन करू शकलो, असेही ते म्हणाले.
वॉर्डातील कोणत्या समस्यांना प्राधान्य द्याल? असे विचारले असताना ते म्हणाले की, प्रचारादरम्यान वॉर्ड मध्ये अनेक समस्या जाणवल्या प्रामुख्याने रस्ते खराब झाले आहेत तर काही ठिकाणी नवीन रस्ते करण्याची आवश्यकता आहे. वेळेवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्नशील असणार तसेच आणि सांडपाणी निचरा करण्यासाठी गटारी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पथदीपही बसवणार असे प्रशांत साबळे यांनी सांगितले.
त्याचबरोबर माणगावकरना कोणते गिफ्ट देणार असे विचारले असता प्रशांत साबळे म्हणाले की, माणगांव नगरपंचायत भ्रष्टचार मुक्त करून माणगांववासीयांना मूलभूत सुविधा उपलब्द करून देणे आणि माजी आमदार कै. अशोक दादा साबळे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच मानगावकरना गिफ्ट असेल त्यासाठी प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे आणि त्यासाठी आमची निवडून आलेले टीम सक्षम आणि अनुभवी आहे तर आम्ही येत्या काळात माणगांवचा कायापालट करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माणगांव व्यापारी असोसिएशनचे बशीर खरेल, इमपीजे संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आरीफभाई कारबेलकर, सामाजिक कार्यकर्ते, यशस्वी उद्योजक माणगांव व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी अरुण क्षीरसागर, माजी सदस्य व वॉर्ड क्र.15 सिद्धी नगरचे अध्यक्ष रणधीर कानोजे उपस्थित होते. दरम्यान आपल्या वॉर्ड मधून 570 मते घेऊन विजय संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

About Belgaum Varta

Check Also

सांगलीत भूकंपाचे धक्के; चांदोली धरण परिसरात जमिन हादरली, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Spread the love  सांगली : सांगलीच्या चांदोली धरण परिसरात आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. धरणातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *