Monday , December 4 2023

कोगनोळी येथे तरुणाची गळफासाने आत्महत्या

Spread the love

कोगनोळी : येथील काशीद गल्लीतील भाडोत्री घरात राहणाऱ्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार तारीख 24 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली.
किरण बाळासाहेब देसाई (वय 40) मुळगाव हडलगा तालुका गडिंग्लज सध्या राहणार कोगनोळी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत घटनास्थळावरून व नातेवाईक यांच्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, किरण देसाई गेले तीन ते चार वर्षापासून कोगनोळी येथे पत्नीसह काशीद गल्ली येथे भाडोत्री घरात राहत होते. त्याने बुदिहाळ तालुका निपाणी येथे स्वतःचा गारमेंट व्यवसाय सुरू केला होता. सोमवार तारीख 24 रोजी नजीकच असणाऱ्या आपल्या सासरवाडीतील पाहुण्यांच्या घरी चहा घेऊन आपल्या घरी जातो असे सांगून घरातून बाहेर पडले. किरण रहात असलेल्या घराचा दरवाजा बराच वेळ उघडल्या नसल्याकारणाने सायंकाळी सहाच्या सुमारास किरण याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, आई, भाऊ असा परिवार आहे. या आत्महत्या पाठीमागील नेमके कारण समजू शकले नाही. घटनास्थळी कोगनोळी पोलीस स्टेशनचे एएसआय एस. ए. कंबार, राजू गोरखनावर, एन. एस. सगरेकर यांनी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह उत्तर तपासणीसाठी निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात पाठवला. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

About Belgaum Varta

Check Also

एस. बी. पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

Spread the love  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील येथील मोहनलाल दोशी विद्यालयात ३१ वर्षे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *