Saturday , July 13 2024
Breaking News

अखेर नैऋत्य मान्सून कोकणात दाखल, हवामान विभागाची माहिती

Spread the love

पुणे : सर्वांसाठीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अखेर आज (10 जून) नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले होते. अखेर मान्सूनची प्रतिक्षा संपली असून नैऋत्य मान्सून कोकणात दाखल झाल्यानं शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागच्या वर्षी मान्सून 7 जूनला तळकोकणात दाखल झाला होता. तर यावर्षी महाराष्ट्रात यायला मान्सूनला तीन दिवस उशीर झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. भारतीय विभागानं सांगितलेल्या अंदाजानुसार मान्सून अखेर कोकणात दाखल झाला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी पुढे सरकारली आणि आज अखेर मान्सून कोकणात दाखल झाला आहे. नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच संपूर्ण गोवा, कोकणचा काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात दाखल झाला आहे.
शेतकर्‍यांना दिलासा
राज्यात मान्सून दाखल झाला ही राज्यातील शेतकर्‍यांसाठी दिलासादायक बातमी आहे. कारण शेतकरी खरीपाच्या पेरणीसाठी मान्सूनची वाट बघत होते. अखेर मान्सून दाखल झाल्यानं शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी हवामान विभागानं पुढच्या 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. कारण कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली होती. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर रुळावर आली असून मान्सून आज कोकणात दाखल झाला आहे.
मुंबईसह उपनगरात पाऊस
आज मान्सून कोकणात दाखल झाला आहे. पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. दरम्यान मुंबईत दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसह अनेक भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर ठाणे, गोरेगाव, कल्याणमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना मान्सूनपूर्व सरींमुळं काहीसा दिलासा मिळाला आहे. भिवंडी शहरासह ग्रामीण भागामध्ये काल अचानक वादळी वार्‍यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस सुरू झाल्याने परिसरात गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर वादळी वार्‍यामुळे शहरात तीन ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली आहे.

About Belgaum Varta

Check Also

वसंत मोरे यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; शिवसेनेत प्रवेश करणार!

Spread the love  मुंबई : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *