Sunday , July 26 2026
Breaking News

शर्मा, जिंदाल यांच्या अटकेसाठी एसडीपीआयची निदर्शने

Spread the love

बेळगाव : प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केलेल्या भाजप नेते नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करण्याच्या मागणीसाठी बेळगावात आज ‘एसडीपीआय‘च्या वतीने निदर्शने करण्यात आली. प्रेषित मोहम्मद पैगंबरांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याने भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल याना अटक करावी, अशी मागणी एसडीपीआयने केली आहे.
या मागणीसाठी संघटनेच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना निदर्शकांनी सांगितले की, कोणत्या प्रसंगी काय बोलावे याची जाण नसलेल्या व्यक्तीला भाजपने प्रवक्ता बनवले आहे. त्यांच्या वक्तव्याने अल्पसंख्यांकांच्या भावना दुखावल्या आहेत. देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही याचा दुष्परिणाम होत आहे.त्यामुळे देशातील गोरगरीब संकटात सापडतील. याला भाजपची असली पिलावळच कारणीभूत ठरेल असा संताप व्यक्त केला.

About Belgaum Varta

Check Also

पत्रकार आणि पोलिसांचा बनाव करून खंडणी उकळणाऱ्या चौघांना अटक; हुक्केरी पोलिसांची धडक कारवाई

Spread the love  बेळगाव : पत्रकार आणि पोलीस असल्याचा बनाव करून नागरिकांना धमकावत खंडणी उकळणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *