Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटकात जेडीएसच्या आमदाराचे काँग्रेसला मतदान!

Spread the love

बंगळूरु : राज्यसभेच्या 16 जागांसाठी चार राज्यांमध्ये आज शुक्रवारी (ता. 10) मतदान होत आहे. राजकीय पक्षांनी घोडेबाजार होऊ नये म्हणून आपापले आमदार हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये ठेवले आहे. दुसरीकडे कर्नाटकात उघडपणे विरोधी मतदानाचा प्रकार समोर आला आहे. वास्तविक श्रीनिवास गौडा आणि श्रीनिवास गुब्बी यांच्यासह कमीत-कमी दोन जनता दल (धर्मनिरपेक्ष) आमदारांनी शुक्रवारी कर्नाटकमध्ये चार जागांसाठी होत असलेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले. राज्यात क्रॉस व्होटींग महत्त्वपूर्ण आहे. कारण एका जागेसाठी मुख्य विरोध पक्ष काँग्रेस आणि जेडीएस दरम्यान एक जबरदस्त लढत पाहायला मिळत आहे.
दोन्ही पक्षांनी भाजपला हरवण्याचा पण केला आहे. जेडीएस आमदार श्रीनिवास गौडा जेव्हा विधानसभा परिसरातून बाहेर पडत होते, तेव्हा त्यांना विचारण्यात आले की त्यांनी कोणाला मतदान केले? यावर ते म्हणाले, मी काँग्रेसला मतदान केले. जेव्हा त्यांना विचारले गेले की असे का केले? त्यावर गौडा म्हणाले, कारण आय लव्ह काँग्रेस (मला काँग्रेस आवडते). यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केले, की ते एच. डी. कुमारस्वामींच्या नेतृत्वाखालील जेडीएस सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. जेडीएसचे अध्यक्ष एच. डी. कुमारस्वामी म्हणाले, की पक्षाचे 32 पैकी दोन आमदारांनी विरोधात जाऊन काँग्रेसला मतदान केले.
आमच्यासारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाचे समर्थन न करता काँग्रेसने भाजपला मजबूत केले आहे. आज संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल येण्याची आशा आहे. निवडणुकीच्या एक दिवसापूर्वी, काँग्रेसचे विधानसभा नेते सिद्धरामय्यांनी जेडीएस आमदारांना खुले पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी काँग्रेसचे उमेदवार मन्सूर अली खानच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. यात दोन्ही पक्षांच्या धर्मनिरपेक्ष विचारसरणीचा विजय होईल, असे म्हटले होते.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *