Friday , April 18 2025
Breaking News

शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार; संजय राऊतांची घोषणा, आमदारांना आवाहन

Spread the love

मुंबई : शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेर गेलेल्या आमदारांची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी असेल, तर त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल. परंतू या आमदारांनी मुंबईत यावे. पुढील २४ तासांत त्यांनी ठाकरेंसमोर यावे. तुम्ही हिंमत दाखवा, नक्की विचार होईल, अशी घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे.
शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यास तयार आहे. परंतू आमदारांनी २४ तासांत मुंबईत परत यावे, तिथे बसून पत्रे पाठवत बसू नये, असे संजय राऊत म्हणाले. मी अधिकृतपणे ही भूमिका मांडतोय, असेही राऊत म्हणाले.

कैलास पाटील कसे निसटले?

आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथून आम्हाला साहेब पुढे आहेत, तिकडे आपल्याला जायचे आहे, असे सांगितले. स्टाफ आमच्यासोबत होता. आम्हाला दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. पुढे निघालो, वसई-विरार मला ते भाग माहिती नाहीत, शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला.

About Belgaum Varta

Check Also

दुकाने अधिकृत मार्केटमध्ये हलवावीत; स्थानिकांचा आग्रह

Spread the love  प्रशासन लवकर पावले उचलणार का? – नागरिकांचे लक्ष लातूर (उदगीर) (अविनाश देवकते) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *